राजर्षी शाहू परिवार आणि वन बुलढाणा मिशनच्या वतीने राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष, वन बुलढाणा मिशनचे संकल्पक व शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाचे बुलढाणा जिल्हा समन्वयक मा.संदीपदादा शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त ४ फेब्रुवारी ते १३ मार्च दरम्यान 🩸रक्तदान महायज्ञाचे🩸 आयोजन करण्यात आले आहे.
दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा रक्तदातांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
मा. संदीपदादा शेळके यांच्या रक्तदान चळवळीतील योगदानाचे सर्वत्र भरभरुन कौतुक होत आहे प्रसंगी रक्तदान महायज्ञात सहभाग नोंदवणाऱ्या सर्व रक्तदात्यांचे मा.दादांनी अभिनंदन केले.
३० जानेवारी २०२५ रोजी राजर्षी शाहू मल्टिस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि. बुलडाणा, र.नं ८१९ (कार्यक्षेत्र : महाराष्ट्र, मध्यप्रदेश) ला सलग दुसऱ्यांदा 'बँको ब्लू रिबन २०२४' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
संस्थेला मिळालेला या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व सभासद, ठेवीदार, संचालक, कर्मचारी, दैनिक प्रतिनिधी, हितचिंतक व संपूर्ण टीम या सर्वांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन...!!
राजर्षी शाहू मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी (र.न. 819) मर्या. लि. बुलढाणा द्वारा स्त्रियांच्या स्तन आणि गर्भाशयाच्या कर्करोगाबाबत भव्य मार्गदर्शन शिबिर १९ जानेवारी २०२५ रोजी माता-भगिनिंच्या उस्फुर्त प्रतिसादामध्ये संपन्न.